प्रविण चव्हाण
नंदुरबार -: कृष्णराव दामजी गावित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शैक्षणिक संकुल कोरीट विद्यालयात आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी संचलित नटावद संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक विभागातील टाकाऊ पासून टिकाऊ, मातीची भांडी ,शेंगांच्या टरपल्यापासून झाडावरील पक्षी, अक्रोडच्या टरफल्यापासून होड्या आणि कीटक तयार करण्यात आले, चहाच्या कागदी कप पासून डमरू, पेनचे स्टँड तयार करण्यात आले फुलांपासून विविध प्रकारच्या कलात्मक रांगोळ्या बेटी बचाव अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण देखावे रांगोळीतून सादर करण्यात आले.
यानंतर सेव वॉटर, सेव अर्थ, वृक्ष संवर्धन तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विज्ञानवर आधारीत रांगोळ्या सादरीकरण करून वैज्ञानिक संदेश साकार करण्याचा प्रयत्न केला तर कला दालनातून विविध अशा पेंटिंग्स आकृत्या सादरीकरण करण्यात आल्या यासाठी विद्यालयातील कलाशिक्षक आर पी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत पाटील यांनी आपल्या चिमुकलांच्या भावनांना त्यांच्या कलेच्या माध्यमातून प्रोत्साहित केले व त्यांच्या ज्ञानावर आधारित विविध अशा कलाकृतीच्या माध्यमातून प्रदर्शन भरविले व रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक,भोगौलिक शैक्षणिक हा संदेश यातून देण्यात आला. इयता 10 वीच्या विद्यार्थीनीने राजेंद्रकुमार गावित यांचे रांगोळीतुन चित्र साकारण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, राजेंद्रकुमार गावित तसेच त्यांच्या कन्या डॉक्टर विभूती गावीत डॉक्टर ऋषिक यांनी या कलाप्रदर्शनास भेट दिली. व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला प्रसंगी मान्यवरांनी विद्यालयाचे प्रवेशद्वाराचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.
याप्रसंगी नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी एम व्ही कदम, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील पंचायत समिती नंदुरबार, एस एन पाटील साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती नंदुरबार. लोकमतचे उपसंपादक रमाकांत पाटील नंदुरबार.
याप्रसंगी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मुकेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले’ या कार्यक्रमासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील जेष्ठ शिक्षक एस व्ही विसपुते यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील विज्ञान शिक्षक एस एन पटेल , मनोज पाटील, प्राध्यापक भरत एम चव्हाण, प्राध्यापक सुनील खाडे, अशोक पटेल, नयना पवार,गणित शिक्षक प्राध्यापक स्वाती बारी यांनी वैज्ञानिक साहित्य निर्मितीसाठी परिश्रम घेतले.
यासाठी विद्यार्थ्यांचे गट केलेत व विज्ञान प्रदर्शन यशस्वीरित्या पूर्ण केले या कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षिका निकम एस एन व मीनाक्षी पटेल यांनी रांगोळी संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर टाकाऊ पासून टिकाऊ तयार करण्याचं तंत्र विद्यार्थ्यांना, विद्यालयातील प्राथमिक शिक्षक सुनंदा पाटील, सविता पाटील, ज्योत्सना देवरे यांनी विद्यार्थ्यांना दिले.
या कार्यक्रम यशस्वी ते साठी मुख्याध्यापक, प्राचार्य व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी राजेंद्र राजपूत व अनिल पाटील यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमाचे आभार प्राथमिक विद्यालयातील शिक्षिका सविता पाटील यांनी मानले.
Users Today : 30