वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर ; महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्था मुंबई,महाराष्ट्र शासनआरोग्य विभाग
यांच्यावतीने दिनांक 17 ते18 जानेवारी२०२३ रोजी रेनबो रिसॉर्ट लोणावळा येथे ,राज्यस्तरीय लोककला पथक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी भारत सरकार साॅन्ग अॅड ड्रामा पुणे,महाराष्ट्र ,गोवा राज्य नोंदणीकृत 36 कला पथकाचे प्रमुख उपस्थित होते, एड्स या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले, चर्चा प्रश्न उत्तरे झाल्यानंतर 36 कला पथक ग्रुप प्रमुखाचे सात समान ग्रुप करून जनजागृती कशी करावी याबाबत सादरीकरण घेण्यात आले, या कार्यशाळेसाठी एडस नियंत्रणसंस्थेच्या संचालक सुदेशना चक्रवर्ती मॅडम संवाद शिक्षण विभागाचे दीपक निकम सर ,राज्य एच आय व्ही प्रतिबंधक विशेष तज्ञ, कविता बोराडे मॅडम, उपसंचालक योगेश परदेशी ,जिल्हा वाशीम एड्स विभागाचेअधिकारी रविंद्र भिसे साहेब उपस्थित होते, या कार्यक्रमातुन मधुकर गायकवाड यांनी पार्टी वाशिम, ग्रुप लीडर शाहीर मधुकर गायकवाड यांना एचआयव्ही एड्स ट्रेनर म्हणुन, महाराष्ट्र राज्य संस्था अधिकारी सुदेशना चक्रवती मॅडम तथा कविता बोराडे मॅडम यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन जनजागृती ट्रेनर म्हणून सन्मानित करण्यात आले.
Users Today : 25