पोलिसांनी दिले विद्यार्थ्यांना रस्ते व सायबर सुरक्षिते विषयी धडे!

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी
प्रविण चव्हाण 
 नंदूरबार: तळोदा तालुक्यातील कोठार येथील अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तालुक्यातील पोलीस प्रशासनाच्या वतीने रस्ता सुरक्षा व सायबर गुन्हे या अभियाना अंतर्गत जनजागृती मोहिम राबविण्यात आली.
तालुक्यातील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षिततेच्या नियमा विषयी व सायबर गुन्हे या आजच्या काळात मोबाईलच्या अति वापरामुळे कशाप्रकारे खूप मोठ्या प्रमाणात मोबाईल हे विद्यार्थ्यांसाठी हानिकारक आहे. व मोबाईल, इंटरनेट हाताळताना ऑनलाईन फेक मेसेज व फोन कॉल्स यांच्याद्वारे ग्राहकांची कशी फसवणूक होवू शकते व त्यांची घ्यावयाची काळजी समजवून सांगितली.
यावेळी पोलीस अजय कोळी, शशिकांत अहिरे यांनी देखील विद्यार्थ्यांना  रस्ते सुरक्षा व मोबाईल वापरा संदर्भात मार्गदर्शन केले. शाळेतील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 9 3 7 7 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *