वाशिम – दिनांक 19 जानेवारी रोजी मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतिगृह सिविल लाईन वाशिम येथे सायंकाळी ७ :०० वाजताच्या सुमारास, मोटिवेशनल मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन १२ जानेवारी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीपर राष्ट्रीय युवा दिन निमित्त करण्यात आले होते. यामध्ये वाशिम जिल्ह्याचे सुपुत्र तथा छ. संभाजीनगर (औबाद) येथे राहत असलेले महाराष्ट्रातील लोकप्रिय पुरस्कार प्राप्त, मोटिवेशनल ट्रेनर, आता मी यशस्वी होणार..! या पुस्तकाचे लेखक तथा माझा स्टुडंट या वृत्तपत्राचे संपादक प्रा. अंकुश शिंदे यांची या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्तीगृहाच्या गृहपालिका वर्षा लाकडे होत्या तर प्रमुख उपस्थिती मध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते तथा स्वच्छ भारत पुरस्कार प्राप्त नेहरू युवा केंद्र मा. तालुका समन्वयक प्रदीप पट्टेबहादूर, यांची उपस्थिती होती. महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना प्रा. अंकुश शिंदे म्हणाले की. सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही घटकांचा समस्येचा अभ्यास हा मानसशास्त्र पद्धतीने करून आपल्या जीवन वाटचालीची दिशा आपण ठरविली पाहिजे.
प्रयत्न करीत असताना अपयश आले असता. त्याचा स्वीकार करून पुढील प्रयत्नशील प्रक्रियेला एकाग्रतेने आणि चिकाटीने प्रयत्न केले पाहिजे. व यशाची योग्य वाट ही निर्माण केली पाहिजे.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणातून म्हणाल्या की , सकारात्मक भावनेतून मिळालेली. प्रेरणा सकारात्मक भावनेतून मिळालेली नवचेतना ऊर्जात्मक प्रक्रियेचे रूप आहे.
या एकविसाव्या शतकातील युवक हा शिक्षित युवा व विकसित युवा विकसित भारत निर्माण करू शकतो..! याकरिता युवकांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे उच्च शिक्षण घेऊन या देशाची शासन करती जमात बनणे गरजेचे आहे. याकरिता स्वामी विवेकानंद ची तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून वाटचाल केली पाहिजे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी कांबळे या विद्यार्थिनींनी केले. तर या
कार्यक्रमाची रूपरेषा प्रास्ताविकेतून प्रदिप पट्टेबहादूर यांनी मांडली सर्व मान्यवरांचे आभार प्रियंका वानखडे या विद्यार्थ्यांनी मानले. यावेळी उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षा वर्षा लाकडे मॅडम, मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रा. अंकुश शिंदे, प्रमुख उपस्थित असलेले प्रदिप पट्टेबहादूर, शुभम बागुल, संतोष शेळके यांची उपस्थिती होती.
Users Today : 8