शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासांठी ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडूंनी ३० जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/ जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार तसेच शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासनाने 14 डिसेंबर, 2022 च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहित केली असून या नियमावलीनुसार 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षांसाठी पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारा विषयी अधिक माहिती व अर्जाचे नमूने https://sports.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरुन उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडूंनी अर्ज भरून जिल्हा क्रीडा अधिकारी, नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुल, खामगाव रोड, साक्री नाका, नंदुरबार येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  पाटील यांनी केले आहे.
0 9 3 7 7 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *