नेताजी..
कठीणतम स्वातंत्र्य
सशस्त्र लढाई विना
स्थापी विचारातूनि
आझाद हिंद सेना
लष्करी रुबाबसार्थ
शोभे सुभाषबाबूंना
शिस्तप्रिय वक्तशीर
रे प्रखर राष्ट्रभावना
राजबिंडे व्यक्तीमत्व
दे आवाज दणाणा
विवेकानंदगुरुस्थान
कैक गुण नजराणा
साखळदंडपारतंत्र्य
असह्य होई वेदना
वारवरती प्रतिवार
जागृत हो संवेदना
मैं तुम्हे आजादी दूं
तुम मुझे खून देना
प्रतिध्वनी हो सर्वत्र
बाबूजींच्या घोषणा
रे घात का अपघात
विवाद सरता सरेना
नेताजी बिरूदावली
का तवयाद विसरेना
देई सुगंध सकलास
सांगणे नलगे चंदना
आठवणी ये दाटूनि
देता तव मानवंदना
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६
www.kavyakusum.com
Users Today : 1