रिसोड_हळद शेडचा विस्तार करणे_हळद ओट्याकडे जाणार्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे._ शेतकऱ्यांचा मालाचे पेमेंट लवकर देण्यासंदर्भात चर्चा_ रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत आज रखडलेल्या कामकाजा बाबत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर व प्रशासक महेंद्र बन्सोड साहेब, सचिव गिर्हे साहेब, विजय देशमुख यांच्या सोबत बैठक संपन्न झाली. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समीतीचा कारभार गेल्या तीन वर्षांपासून शासकीय प्रशासकांच्या भरवशावर आहे. त्यामुळे कुठलाच राजकीय हस्तक्षेप कामकाजात नाही. आसे आसतांनाही सार्वजनिक स्वरूपाची कामे होतांना दिसत नसल्याची खंत भूमिपुत्र च्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. यावेळी रिसोड शहर अध्यक्ष विकास झुंगरे, युवक उपजिल्हाप्रमुख रवि पाटिल जाधव, सीतारामजी इंगोले, सीताराम लोखंडे यांची बैठकीला उपस्थिती होती. शेतकरी हिताचे निर्णय आणि कामे प्रशासन करणार नसेल तर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या प्रशासना विरोधात अंदोलन करणार आसल्याचे शहर अध्यक्ष विकास झुंगरे व उपजिल्हाप्रमुख रवि जाधव यांनी सांगीतले. यावेळी कामा बाबत प्रशासना सोबत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
Users Today : 25