कंम्बाईन्ड डिफेन्सच्या पूर्व प्रशिक्षणासाठी 30 जानेवारी रोजी मुलाखतीचे आयोजन

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिंसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदासाठी 16 एप्रिल 2023 रोजी संघ लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी 30 जानेवारी 2023 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे असे जिल्हा सैनिक अधिकारी संजय गायकवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिेसेस (सीडीएस) या परिक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतींसाठी 1 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2023 या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक 60 साठी प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार पात्र राहील. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन आणि प्रशिक्षण नि:शूल्क उपलब्ध करुन देण्यात आली आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे सोमवार 30 जानेवारी ,2023 रोजी मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येतांना विद्यार्थ्यांनी फेसबूक वरील वेब पेजवर सैनिक कल्याण विभाग,पुणे वर सर्च करुन त्यामधील सीडीएस-60 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पुर्ण भरुन सोबत आणावी.अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी क्रमांक 0253-2451032/ 8888798584 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,   असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.

0 9 4 8 0 4
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *