पोस्टमास्तर जनरल औरंगाबाद येथे 31 जानेवारी रोजी डाक अदालतीचे आयोजन

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: औरंगाबाद क्षेत्रासंबंधित टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल 31 जानेवारी,2023 रोजी सकाळी 11.00 वाजता औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या डाक अदालतीत घेण्यात येणार असल्याची माहिती  धुळे विभाग, प्रवर अधिक्षक डाकघर, प्रताप सोनवणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
डाक अदालतीत टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र अशा सेवे बाबतच्या तक्रारींचा समावेश असेल. संबंधितांनी डाक सेवे बाबतची आपली तक्रार.क.शेषराव, सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज.शि ), पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद 431002 यांचेकडे 30 जानेवारी, 2023 पर्यंत दोन प्रती सह अथवा तत्पुर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. अर्जाचा नमुना www.maharashtrapost.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे प्रवर अधिक्षक डाकरघर,धुळे यांनी कळविले आहे.
0 9 4 6 7 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *