मेहकर.स्किल डो मार्शल आर्ट असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांचे वतीने नुकतेच 5व्या नॅशनल स्किल डो चॅम्पियनशिप 22-23चे आयोजन गोवा येथे करण्यात आले होते. दि.22 जानेवारी 2023रोजी संपन्न झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये देशातील विविध राज्यातील विध्यार्थ्यानी सहभाग घेतला. त्या स्पर्धा सब जुनिअर, जुनिअर, सिनिअर गट यामध्ये घेण्यात आली. सदर स्पर्धा फाईट, काता या दोन इव्हेंट मध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत सब जुनिअर गटामध्ये वजन निहाय स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये 16
किलो वजन गटात देवांशी प्रविण काठोळे हिला दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे गोल्ड पदक मिळाले, 27किलो वजन गटात अदिती रवींद्र साठे हिला काता या स्पर्धेत गोल्ड तर फाईट मध्ये सिल्वर पदक मिळाले.30किलो वजन गटात संस्कृती किशोर सोळंके हिला काता स्पर्धेत गोल्ड तर फाईट मध्ये ब्राँझ पदक मिळाले 36 किलो वजन गटात सिद्धार्थ प्रभाकर इंगळे याला काता स्पर्धेत सिल्वर तर फाईट मध्ये ब्राँझ पदक मिळाले. तर राणा तेजसिंग किशोर सोळंके ह्याला फाईट मध्ये गोल्ड तर काता मध्ये ब्राँझ पदक मिळाले तसेच जुनिअर गट 45 वजन गटात अंकिता पापाराम साळवे हिला दोनी स्पर्धेत ब्राँझ पदक मिळाले. सदर स्पर्धेसाठी स्किल डो मार्शल आर्ट असोसिशन बुलढाणा जिल्ह्याचे सेंसाई प्रशिक्षक श्री सुनील चव्हाण, श्री राज देव्हडे यांनी वरील विद्यार्थी यांना प्रशिक्षित केले होते. सदर स्पर्धेसाठी प्रशिक्षक यांनी अथक मेहनत घेतल्याने विद्यार्थी यांनी राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करून दाखविली. व इंटरनॅशनल स्पर्धेत खेळ्न्यासाठी त्यांची निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील भरीव यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थी यांचे कौतुक होत आहे. सदर स्पर्धेसाठी विद्यार्थी यांचे पालकवर्ग श्री प्रविण काठोळे, श्री किशोर सोळंके, रवींद्र साठे, प्रभाकर सोळंके यांनी विशेष सहकार्य केले
मेहकर सारख्या खेळामधें मागास असलेल्या ग्रामीण भागातून कराटे सारख्या राज्यस्तरीय स्पर्धेत मुला मुलींनी मिळवलेल्या या भरीव यशाबद्दल सर्व स्तरातून मुलामुलींचे कौतुक होत आहे. तसेच कराटे क्लासेस चे संचालक सेन्साई श्री सुनील चव्हाण व श्री राज देव्हडे यांचे अभिनंदन होत आहे.
Users Today : 19