अक्कलकुवा पोलीस दलाकडून अवैध दारूचा साठा करणाऱ्यावर धडक कारवाई : 28 लाख 95 हजार 504 रुपये किमंतीची बेकायदेशीर विदेशी दारु जप्त.

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: अक्कलकुवा पोलीस दलाने  अवैधरीत्या वाहतूक केले जाणारे दारू साठा व  वाहन, असा एकूण 28 लाख 95 हजारांचा 504 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला  आला आहे.
      सविस्तर माहिती अशी की,
  दिनांक 25 जानेवारी रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक  पी. आर. पाटील यांचे मार्गदर्शना खाली अक्कलकुवा पोलिसांची धडक कारवाई.
 अक्कलकुवा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी राजेश गावित यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,  अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतुन गुजरात राज्यात अवैध दारूची वाहतूक होणार असल्या बाबत माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक  पी आर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक. निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, यांचे मार्गदर्शन घेऊन  अक्कलकुवा पोलिसांनी आरटीओ चेक पोस्ट येथे अवैध वाहतूक करणाऱ्या कंटेनर वर छापा टाकून कंटेनर पकडला सदर कारवाईत अज्ञात आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
  त्याबाबत अक्कलकुवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर कारवाई सपोनी राजेश गावित, पोलीस उपनिरीक्षक  रितेश राऊत, पोना किशोर वळवी, पोना गुरुदेव मोरे, पोना अतुल गावीत, पोना देविदास विसपुते, पोना खुशाल माळी, पोशी प्रशांत यादव, पोलीस हवालदार उल्हास ठिंगळे,  पोना संजय सूर्यवंशी, पोशी सतीश वळवी, पोशी अविनाश रंगारे असे पथकाने कारवाई केली आहे
0 9 3 7 8 1
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *