प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: शहरातील नागाई नगर परिसरातील नंदुरबार नगरपरिषद संचलित सरस्वती विद्या मंदिरात देशाच्या ७४ वा प्रजासत्ताक दिन नागाई नगर व परिसरातील विविध विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
निवृत्त कर्मचाऱ्यांतर्फे विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, रबर,पट्टी,व शार्पनर अश्या वस्तूंचा पूर्ण सेट वाटप करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमासाठी, निवृत्त कर्मचारी कुकावलकर,
एम.एन.चव्हाण,अशोक पटेल,एस. आर. पाटील, आय.जी.मराठे , जी. एस. हिवरे ,एन.टी. अग्निहोत्री , पी. के. मराठे, शहरातील व परिसरातील नागरिकांच्या उपस्तित तिरंगाला मानवंदना देत मोठया उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
Users Today : 20