निलेश अहेर : (शहादा प्रतिनिधी)
दि.२८ शहादा (नंदुरबार)
शहादा तालुक्यातील विविध भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. परिणाम, नागरिकांना प्रचंड कसरत करावी लागत असून अश्या रस्त्यांमुळे रोजच लहान मोठे अपघात होत असल्याचे समोर येत आहे. सदर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी अनेकवेळा केली मात्र, संबंधितांचे याकडे दुर्लक्ष असल्याने अखेर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आज म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुभाष पाटील, युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, तालुकाध्यक्ष सुरेश नाईक, तालुका प्रभारी अध्यक्ष योगेश पवार, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार, माजी उपसभापती किशोर पाटील, पंचायत समिती सदस्य जाधव ठाकरे, सत्येन वळवी, काँग्रेस सेवादल (यंगब्रिगेड) प्रकाश पवार आदी काँग्रेस कार्यकर्त्यांसह परिसरातील सरपंच, उपसरपंच सदस्य उपस्थित होते.
Users Today : 20