दि.2 फेबुवारी,2023
प्रविण चव्हाण जिल्हा प्रतिनिधी दैनिक खोज मास्टर न्यूज नंदुरबार..
नंदुरबार – लोखंडी पिस्तूल घेऊन परिसरात दहशत पसरविणाऱ्या दिपक मनोजभाई यादव, (सुरत) येथील एकास नंदुरबार शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दि. 30 जानेवारी रोजी जेरबंद केले.
त्यांच्याकडून एक लोखंडी पिस्टल आणि एक काडतुसे,असा एकूण 15 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
अधिक माहिती अशी कि,
नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समाजकंटक व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हाया या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अवैध अग्निशस्त्र व शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कायदेशीर करणेबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना मासिक गुन्हे सुचना दिल्या होत्या.
वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अवैध अग्निशस्त्र व शस्त्र बाळगणाऱ्यांची इत्यंभूत माहिती घेवून आपले बातमीदारांमार्फत माहिती घेत होते. दि. 30 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना डायल-112 द्वारे माहिती मिळाली की, नंदुरबार शहरातील बस स्थानकाजवळ एका इसमा जवळ बंदुक दिसून आली आहे, अशी माहिती दिली. सदरची माहीती पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्याचे पो. निरीक्षक कळमकर यांना कळवून माहीतीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
शहर पोलीस ठाण्याचे पो. निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सदरची माहिती देवून संशयीत इसमाचा शोध घेवून ताब्यात घेणे बाबत कळविले.
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने नंदुरबार शहरातील बस स्थानका जवळ व आजू-बाजूच्या परिसरात जावून संशयीत इसमाचा शोध घेतला असता एक इसम गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना पाहून पळून साई प्लाझा मध्ये पळू लागला, म्हणून पथकाला संशय आल्याने त्यास ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेला इसम दिपक मनोजभाई यादव (27) रा. अंकुर अपार्टमेंट पर्वत गाव,सुरत . ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाची झडती घेतली असता त्याच्या कब्जात 15 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व व 600/- रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस मिळून आले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडे अधिक विचारपूस केली असता तो, (प्लॉट क्रमांक 111, राणी लक्ष्मीबाई चाळ, कांदीवली ईस्ट,) मुंबई येथील राहाणार असून मागील 04 महिण्यांपासून उत्तर प्रदेश राज्यातील जोनपूर जिल्ह्याच्या रामपुर गावात राहात असले बाबत सविस्तर माहिती दिली.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाविरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे नंदुरबार शहरामध्ये येण्याचे कारण काय ? याबाबत माहिती घेण्यात येत आहे. तसेच सदर गुन्ह्यात सहभाग असणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक एस.बी. आहेर, संदिप गोसावी पोलीस नाईक भटु धनगर, विशाल मराठे, अनिल बढे यांनी केली कारवाई.
Users Today : 20