राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट क्रमांक 74 वरील वाहतूक बंद

Khozmaster
1 Min Read

प्रविण चव्हाण 

नंदुरबार,दि.8 फेब्रुवारी,2023

     नंदुरबार :रेल्वे लाईन दुरुस्तीच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट नंबर 74 कि.मी.114/28-30 या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक 10 फेब्रुवारी,2023 सकाळी 8 पासून ते 14 फेब्रुवारी, 2023 रोजी सांयकाळी 20-00 वाजेपर्यंत बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या  कालावधीत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रेल्वे गेट क्रमांक 73 कडून वळविण्यात येत आहे. उक्त मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याने सदर कालावधीत काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही, यासाठी पोलीस विभागाने रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधुन यामार्गावरील वाहतूक वळविण्याबाबत कार्यवाही करावी.

 असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0 9 4 6 6 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *