ओम शांती शिवरात्री महोत्सवात पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आरती

Khozmaster
1 Min Read

प्रविण चव्हाण (जिल्हा प्रतिनिधी )

दैनिक खोज मास्टर न्यूज.

दि.19/02/2023

नंदुरबार -:  प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अर्थात ओम शांती परिवारातर्फेे आयोजित महाशिवरात्री महोत्सवात जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

गुरुनानक मंगल कार्यालयात आयोजित केदारनाथ शिवलिंग दर्शन आणि लेझर शो कार्यक्रमास गेल्या दोन दिवसात हजारो भाविकांनी हजेरी लावली.

महाशिवरात्री निमित्त सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष परवेज खान, उद्योजक प्रकाश अग्रवाल, मोहन खानवाणी, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, मीडिया जिल्हा समन्वयक महादू हिरणवाळे,संचालिका विजयादिदि,उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीके योगिता दीदी यांनी केले.याप्रसंगी आलेल्या शेकडो भाविकांना प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे महाशिवरात्रीचे महत्त्व सांगण्यात आले.

सलग तीन दिवस आयोजित कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या जयचंद नगर मुख्य शाखा आणि सिंधी कॉलनी उपकेंद्राच्या बंधू भगिनी साधकांनी परिश्रम घेतले.

0 9 4 6 6 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *