लेझर शोमध्ये आकर्षक विद्युत रोशनईच्या झगमगाटात शिवरायांच्या पुतळा उजळला

Khozmaster
1 Min Read

प्रविण चव्हाण (जिल्हा प्रतिनिधी )

दि.19/फेब्रुवारी.

माजी आ. चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाचा उपक्रम

नंदुरबार :- श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित लेझर शो ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.नाट्य मंदिरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्या भोवती रंगीबिरंगी आकर्षक विद्युत रोशनईच्या झगमगटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. लेझर शोमध्ये शिवरायांच्या जयघोष करीत तरुणाईने जल्लोष साजरा केला.

नंदुरबार शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास प्लेझर शोच्या प्रारंभी शिवसेनेचे नेते,माजी आ. चंद्रकांत रघुवंशी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सायंकाळी ६ वाजता लेझर शो ला प्रारंभ झाला. डीजेच्या दणदणाटात शिवरायांच्या कार्याला उजाळा देणारे गीते, पोवाड्यांवर अवघी तरुणाईने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकार केला.

लेझर शो मध्ये आकर्षक,मनमोहक सप्तरंगांची विद्युत रोषणाई, लखलखणारे विद्युत फोकसमुळे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.अधून मधून तोफेतून गुलाबाच्या पाकळ्या,सोनेरी रंगांच्या कागदांचे बार उडवण्यात येत होते.’राणा की जय, जय शिवाजी की जय जय’, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणा देण्यात येत होत्या

*तरुणाई उतरली रस्त्यावर*

शिवरायांच्या जयघोष व हातात भगवा झेंडा घेत अवघी तरुणाई रस्त्यावर उतरली होती. तरुणाईच नव्हे तर लहान-मोठ्यांपासून अबाल वृद्ध देखील लेझर शोमध्ये सहभागी झाले होते.

अनेक युवती महिलांनी शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

0 9 4 6 6 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *