फळ बागायतदार खरेदी विक्री संघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार

Khozmaster
1 Min Read

प्रविण चव्हाण

( जिल्हा प्रतिनिधी )

नंदूरबार :-तालुका ढेकवद फळ बागायतदार खरेदी विक्री सहकारी संघाचे चेअरमन संजीव कृष्णसिंह रघुवंशी, व्हा.चेअरमन गायत्री आंबालाल पाटील यांची तसेच नूतन संचालक मंडळाच्या सत्कार शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते त्यांच्या सत्कार करण्यात आला.

नंदुरबार तालुका ढेकवद फळ बागायतदार खरेदी विक्री सहकारी संघाच्या कार्यालयात आज रविवारी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, नवनियुक्त संचालक लिंबा पाटील,हिरालाल पाटील, संजय पाटील,लालसिंग पाटील, प्रभुदयाल पाटील, राजेंद्र पाटील, बाबुलाल राठोड,नाथ्या वळवी, सुभद्रा पाटील उपस्थित होते.

0 9 4 6 6 2
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *