जागतिक महिला दिनानिमित्त्य एक दिवसीय कार्यशाळा सरनाईक महाविद्यालय वाशिम येथे संपन्न

Khozmaster
3 Min Read

वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर*

 

वाशिम : स्थानिक श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेकर अभ्यासकेंद्र व श्री रामराव सरनाईक वाशिम यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालय, महिला दिना निमित्य “भारतीय स्त्रियांच्या उत्थानात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान ” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन कण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किशोर वाहाणे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यापीठ स्तरिय कार्यशाळेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख वक्तेव मान्यवरांचा परिचय करून दिला व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या .यानंतर कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्रा.डॉ.पदमानंद तायडे सर यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून स्त्री उत्थानात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, मनुस्मृतीचे दहन, महिलासाठी केलेली आंदोलने,चळवळी मिळालेली कार्यरूपी प्रेरणा ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे तथागत भगवान गौतम बुद्ध , संत कबीर आणि क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांना गुरुस्थानी मानत . तथागत गौतम बुद्धांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्त्री – पुरुष समानतेवर भर दिला . संत कबीर हे स्त्री – पुरुष यातील भेद हा शरीराचा भेद मानत . महात्मा फुले हे समानतेचे आणि स्त्री स्वातंत्र्यचे कट्टर समर्थक / पुरस्कर्ते होते . स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणे मानसन्मानाने प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे म्हणून स्त्रियांना पुरुषप्रधान / पितृसत्ताक संस्कृतीच्या दास्यातून मुक्त करण्याचा त्यानी विडा उचलला होता . एकोणिसाव्या शतकात जोतिबानी स्त्रियांच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय असे कार्य केले आहे.याविषयी चर्चा केली. याप्रमाणे त्याची प्रतिमा होती. त्यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे व त्यांची पुस्तके वाचण्यास प्रोत्साहीत केले. व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या महिलाविषयक कार्यावर प्रकाश टाकला. यानंतर कार्यशाळेच्या अध्यक्षा मा. सौ अनिताताई सरनाईक यांनी आपल्या भाषणातुन जागतिक महिला दिनाचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला तसेच गार्गी, लोपमुद्रा, आईसाहेब जिजाऊ इ. कर्तुत्वावान महिलाचा दाखला देवून स्त्री कर्तृवाचा गौरव केला यावेळी महाविद्यालयातील नियमित कर्तुतवान् विद्यार्थ्यांनीचा सत्कार करण्यात आला व कार्यशाळेतील उपस्थित विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात आले. लिंगभाव समानता कक्षाचे सहसमन्वयक प्रा. डॉ. गजानन हिवसे यांनी उपस्थित मान्यवराचे आभारव्यक्त केले कार्य शाळेचे संचालन कु मयुरी अवताडे या विद्यार्थीनीने केले. यावेळी

कार्यशाळेला ज्येष्ठ प्राध्यापक डॉ संजय साळीवकर, प्रा. पंडीत नरवाडे, प्रा. गजानन बारड, प्रा.डॉ. वसंत राठोड, प्रा रविन्द्र पवार, प्रा. डॉ. संजय, साळवे, प्रा. मनिषा किर्तने, प्रा. दिपाली देशमुख, प्रा. पंढरी गोरे, प्रा. विजय वानखेडे वप्रा. डॉ.प्रसेनजित चिखलीकर, विद्यार्थिनी आकांक्षा गायकवाड,राणी सरकटे, निकिता पट्टेबहादुर , दिपाली तिवले, शिवकन्या सरकटे, यांनी परिश्रम घेतले तरसर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी या कार्यक्रमाला उपस्थित दर्शविली होती.

 

0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *