वाघोडा वरुड ग्रामपंचायत अंतर्गत चालू असलेल्या सिमेंट रोडचे काम निष्कृष्ट दर्जाचे

Khozmaster
2 Min Read

 

गजानन माळकर 

तालुका प्रतिनिधी मंठा-.वाघोडा वरुड तालुका मंठा येथे 25 15 योजनेअंतर्गत दोन कामे चालू आहेत प्रत्येकी पाच लक्ष वजा दहा लक्ष रुपयांचे सिमेंट रस्ता काम झाले आहे असे रेकॉर्ड पाहता झाल्याचे दिसून येत आहे परंतु सदरील कामे अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नाही सदरील रोड हा यापूर्वीच करण्यात आलेला आहे आणि आता परत त्याच रस्त्यावर बोगस काम करून लाखो रुपयांचे बिल काढण्यात येत आहेत सदरील कामासाठी लागणारी रेती सिमेंट हे सर्व निकुष्ट दर्जाचे असून कामाची रुंदी पण कमी आहे पाण्याचा वापर

कमी करण्यात येत आहे काम अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे मटरेल वापरण्यात यावे कामाची लांबी रुंदी अंदाजपत्रकात नमून केल्याप्रमाणे घेण्यात यावी असे सांगितले असता संबंधित अर्जदारास अरेरावी केली व सदरील काम अंदाजपत्रकात नमूद केल्यानुसार करण्यात यावे हीच आमची मागणी आहे परंतु संबंधित गुत्तेदार यंत्रणा हे ऐकत नाही व आरेरावीची भाषा करत आहेत कामावर संबंधित यंत्रणेचे अधिकारी यांचे लक्ष दिसून येत नाहीत त्यामुळे काम निकुष्ट दर्जाचे होत आहे याबाबत संबंधित यंत्रेनेतील लोक म्हणतात ही सदरील कामे असेच होणार आम्हाला देखील काम मंजूर करून आणण्याकरता 15 ते 20 टक्के रक्कम अगोदर द्यावी लागते तुम्ही कामाची पाहणी करणारे कोण आमचे राजकीय मंडळी व मोठ मोठाले अधिकारी यांना सांभाळावे लागते त्यामुळे परत तुम्ही कामावर आला तर तुमच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करू आणि तुम्हाला जेलमध्ये टाकू त्यामुळे भविष्यात नोकरी लागणार नाही आणि परत कामावर यायचे नाही अशी धमकी दिली आहे याबाबत सदरील यंत्रणा हे बनावट रेकॉर्ड करून त्या आधारे सदरील कामाचे बिल उचलण्याचे प्रयत्न करत आहेत त्यामुळे बिल उचल केल्यावर परत काम होणार नाही परिणामी शासनाचे उद्दिष्ट साध्य होणार नाही व जनतेची दिशाभूल होईल सदरील रोड हा एकाच पावसाळ्यात वाहून जाऊ शकतो आणि त्यामुळे खडी उघडी पडून अपघाताचे प्रमाण होऊ शकतात तेव्हा आपणास विनंती करण्यात येते की सदरील विषय आपण स्वस्त तात्काळ चौकशी करून जोपर्यंत नियमाप्रमाणे काम पूर्ण व अंतिम होत नाही तोपर्यंत सदरील कामाचे कोणतेही दे अदा करू नये असे निवेदन ग्रामपंचायत सदस्य भगवान गव्हाणे व नागरिक मारुती लोमटे आदी ने दिले आहे.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *