जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Khozmaster
1 Min Read

 

नंदुरबार -: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये 10 एप्रिल,2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0 9 4 6 5 7
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *