बोलणं ही समोरच्यावर प्रभाव पाडणारी कला ; प्रदिप पट्टेबहादुर

Khozmaster
2 Min Read

नेहरू युवा केंद्राचे  नेतृत्व व समुदाय प्रशिक्षण संपन्न

वाशिम ; युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र वाशिम यांच्या वतीने युवा नेतृत्व एवं समुदाय विकास प्रशिक्षण शिबिराची आयोजन वाशिम येथे मा गंगा मेमोरियल माहिती हॉस्पिटल येथे तीन दिवसीय निवासी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाच्या सायंकाळी सत्रा मध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते तथा माजी राष्ट्रीय युवा युवा कलाकार पर्यावरण प्रेमी वन्यजीव रक्षक युवा पत्रकार विविध पुरस्कार प्राप्त. प्रदीप पट्टेबहादूर प्रमुख मार्गदर्शक लाभले होते. यावेळी आपल्या मार्गदर्शनातून बोलताना ते म्हणाले की ; बोलणं ही समोरच्यावर प्रभाव पाडणारी कला आहे. तुमच्या बोलण्यावरून समोरचा तुमच्याबद्दलचं मत तयार करतो. करिअर म्हणून नाही, तर व्यवहारात सगळ्याच ठिकाणी संवाद कौशल्य आवश्यक असतं. कधी स्टेजवर जाऊन, तर कधी चारचौघांमध्ये बसून बोलण्याची गरज पडते. त्यावेळी तुमच्यात स्टेज डेअरिंग (Stage Daring) म्हणजे सभाधीटपणा किती आहे, हे लक्षात येतं. एखादा मुद्दा व्यवस्थितपणे तुम्ही मांडू शकता की नाही, श्रोत्यांवर तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडतो की नाही, हे सगळं तुम्ही किती व्यवस्थित बोलता, यावरच अवलंबून असतं. स्टेज डेअरिंग सगळ्यांना जमत नाही. बोलण्याचं कौशल्य असलेले लोकच आपला विचार दुसऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहचवू शकतात. इतरांना मात्र कायमच इतकं छान कसं बोलावं, असा प्रश्न पडतो. अनेकदा संभाषण कौशल्य नसल्यामुळे मनातील गोष्टीही समोरच्याला सांगण्याची अडचण होते. त्यामुळे मिळालेल्या संधीचे सोने करून शाळा महाविद्यालय सामाजिक कार्यक्रम , प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा, शिक्षण वाचन अशा विविध सहभाग घेणे यामध्ये मिळालेली माहिती संधी येथून आपल्याला स्टेज डेरिंग आत्मविश्वास जागरूकता बळकट होती. अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी मार्गदर्शन केले प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांच्याकडून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी गेम कृतिशील गीताच्या माध्यमातून त्यांच्याकडून ऍक्टिव्हिटी करून घेतल्या अनेक आत्मविश्वासाची भावना जागृत केली. यावेळी उपस्थित नेहरू युवा केंद्र कार्यालयाच्या अर्चना मुंडे मॅडम, प्रियंका इडोळे मॅडम, दत्ता मोरे यांची उपस्थिती होती. नेहरू युवा केंद्र वाशिम जिल्हा युवा अधिकारी आशिष पंथ व लेखा अधिकारी अनिल ठेगे यांच्या मार्गदर्शनाखाली केण्यात आला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल सरकटे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज राठोड तर उपस्थित सर्वांचे आभार पंकज पडघाण यांनी मानले..

 

0 9 3 7 1 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *