पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिली वैद्यकीय महाविद्यालयास भेट; चांगले डॉक्टर बनुन रुग्णांची सेवा करण्याचे केले आवाहन

Khozmaster
2 Min Read

प्रविण चव्हाण नंदुरबार – : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली. या भेटीदरम्यान भावी डॉक्टरांना चांगले डॉक्टर बनुन रुग्णांची सेवा करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी डॉ.गावित म्हणाले की, नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे हे माझे स्वप्न होते. त्यासाठी मी २०१२ पासून प्रयत्न केले ते स्वप्न आज पुर्ण झाले असून नंदुरबार हा आदिवासी बहूल जिल्हा असून या भागातील बहूतांश रूग्णांमध्ये सिकलसेल, कुपोषण व रक्त संबंधीत तसेच विविध दुर्धर आजाराचे रुग्ण आपणास दिसून येतील. त्यामुळे या महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवा देत असतांना आपणांस वैद्यकीय संशोधनाचा अनुभव मिळेल व आपल्या वैद्यकीय ज्ञानात अधिक भर पडुन आपण चांगले डॉक्टर व्हा व रुग्णसेवा करा,असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने विद्यार्थ्यांचाही पालक असुन विद्यार्थ्यांच्या व संस्थेच्या अडचणी सोडवण्याची जबाबदारीही माझी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी पालकमंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते एम.बी.बी.एस. परीक्षेचा 100 टक्के निकाल लागल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळालेले विद्यार्थी महोम्मद शेख, भक्तिसिंग व अनुजका तडकसे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्राध्यापक शल्यचिकीत्साशास्त्र डॉ. तुषार पाटील यांना रुग्णालयीन प्रशासनाच्या कामासाठी उपअधिष्ठाता तर सहयोगी प्राध्यापक डॉ. योगेश बोरसे यांना बधिरीकरणशास्त्र वैद्यकीय अधिकृषक म्हणून नियुक्ती दिल्यामुळे त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राध्यापक डॉ तुषार पाटील, सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रविणकुमार ठाकरे, डॉ. योगेश बोरसे, डॉ.संतोष पवार, सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमाले किनगे, डॉ. सुधाकर बंटेवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन द्वितीय वर्षातील विद्यार्थी हर्षल केदारे यांनी केले. प्रारंभी त्यांनी महिला रुग्णालय तसेच आयुष रुग्णालयातील द्वितीय वर्षांच्या प्रयोगशाळा विभागाची पाहणी केली.

 

 

0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *