एप्रिल फुलचा दिवस म्हणजे मोदी विकासाचा वाढदिवस

Khozmaster
2 Min Read

नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवकतर्फे केक कापून निषेध आंदोलन

प्रविण चव्हाण नंदुरबार- :सद्याच्या स्थितीत देशात वाढती बेरोजगारी, वाढती महागाई आदी समस्यांनी जनता त्रस्त झाली आहे. भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पार्टीने सत्तेत बसण्यासाठी जनतेला आश्वासनांचे लॉलीपॉप दिले आहे. विकासाच्या नावाखाली मोदी सरकारने जनतेला एप्रिल फुल बनविले आहे. याचा निषेध नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे केप कापून मोदी विकास म्हणजे फसवा विकास म्हणून मोदी विकासाचा वाढदिवस साजरा करुन एक प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी वाढती बेरोजगारी, महागाई विरोधी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख यांच्या सुचनेने तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राऊ बाबा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील गिरीविहार गेट परिसरात केप कापून मोदी विकास म्हणजे फसवा विकास म्हणून मोदी विकासाचा वाढदिवस साजरा करुन एक प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच भारतीय जनता पार्टीने सत्तेत बसण्यासाठी जनतेला जे-जे आश्वासनांचे लॉलीपॉप दिले होते, त्याचा एक निषेध म्हणून जनतेला खरे लॉलीपॉप वाटप करुन केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी वाढती बेरोजगारी, महागाई विरोधी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. यावेळी जिल्हा सदस्य माधवभाई चौधरी, कार्याध्यक्ष कमलेश चौधरी, लक्ष्मण मोरे, महेंद्र चौधरी, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुरबार शहराध्यक्ष लल्ला मराठे, तालुकाध्यक्ष दिनेश माळी, युवक कार्याध्यक्ष कालू पहेलवान, संघटक जितेंद्र ठाकरे, जयंत मोरे, धनराज बच्छाव, राजा ठाकरे, रवींद्र जावरे, निलेश चौधरी, राजु शिंदे.गणेश बागले, मुकेश ठाकरे आदी उपस्थित होते.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *