प्रसिद्ध प्रा.विठ्ठल कांगणे यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे 9 एप्रिल रोजी वाशिम येथे आयोजन

Khozmaster
2 Min Read

वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर* ; महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे युवकांना मार्गदर्शन व प्रेरणा देणारे सर्वांच्या परिचयाचे असलेले प्रा. विठ्ठल कांगणे सर संचालक स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री शांताबाई गोटे कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी काळे लॉन मंगल कार्यालय अकोला नाका वाशिम येथे दुपारी १: ०० वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री शांताबाई गोटे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वाशिम व युवा सेना तालुका प्रमुख सुमित गोटे यांनी केले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित वाशिम यवतमाळ संघाच्या खासदार भावनाताई गवळी, आमदार लखन जी मलिक, माजी आमदार विजयराव जाधवश्री राजू पाटील राजे, डॉ.विजय कानडे,डॉ. सिद्धार्थ देवळे, डॉ.नारायणराव गोटे, प्रा.जीएस कुबडे ,प्रा. बी आर तनपुरे , डॉ. संकेत काळे, श्री विजय खांजोडे, श्री महादेव ठाक,रे श्री भागवत भाऊ गवळी, श्री प्रकाश महाले, व श्री शामभाऊ दुरतकर , त्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. वाशिम जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाचा शिखरापर्यंत पोचविण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्याकरिता शिक्षकांचा सत्कार आणि तसेच स्पर्धा परीक्षा मधून अधिकारी पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव देखील करण्यात येणार आहे.  तरी जिल्ह्यातील सर्व तरुण युवक युवती यांनी प्रमुख मार्गदर्शक प्रा. विठ्ठल कांगणे सर यांचे मार्गदर्शन ऐकण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती आव्हान यावेळी मातोश्री शांताबाई गोटे कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय व कार्यक्रमाचे आयोजक प्रा. सुमित गोटे युवा सेना तालुकाप्रमुख यांनी केले आहे.

 

0 9 3 7 1 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *