प्रसिद्ध प्रा.विठ्ठल कांगणे यांचे विद्यार्थी भारती संघटनेच्या वतीने वाशिम येथे स्वागत

Khozmaster
2 Min Read

पोरांनो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श घेऊन आई-वडिलांचे स्वप्न साकार करा ; प्रा.विठ्ठल कांगणे

वाशिम प्रतिनिधी ; महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे युवकांना मार्गदर्शन व प्रेरणा देणारे सर्वांच्या परिचयाचे असलेले प्रा. विठ्ठल कांगणे सर संचालक स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी यांचे विद्यार्थी भारती संघटना जिल्हाध्यक्ष प्रदिप पट्टेबहादूर, सामाजिक कार्यकर्त्या दिव्या देशमुख, सामाजिक कार्यकर्ते अक्षय नवघरे,भूषण बागरे , मंगेश पडघान,विकास भिसे, हरीश डोंगरे, यांच्या वतीने भारतीय घटनेची शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार रुपी स्वागत करण्यात आला.या वेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री शांताबाई गोटे कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी काळे लॉन मंगल कार्यालय अकोला नाका वाशिम येथे दुपारी १: ०० वाजता करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री शांताबाई गोटे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वाशिम व युवा सेना तालुका प्रमुख सुमित गोटे यांनी केले आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले सर्वांच्या परिचयाचे प्रसिद्ध प्रा. विठ्ठल कांगणे सर यांनी युवकांना स्पर्धा परीक्षा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श घेऊन युवकांनी आई-वडिलांचे स्वप्न साकार केली पाहिजे. तेव्हाच स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील युवा हा निर्माण होऊन या देशाची धुरा सांभाळेल..या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.नारायणराव गोटे होते तर मला प्रमुख उपस्थित विभागीय शिक्षण आमदार अमरावती आणि किरण राव सरनाईक, युवा सेना प्रमुख रवी भांदुर्गे , शहर प्रमुख श्री शामभाऊ दुरतकर , प्रा.जीएस कुबडे ,प्रा.बी आर तनपुरे , डॉ. संकेत काळे, श्री विजय खांजोडे,श्री महादेव ठाक,रे श्री भागवत भाऊ गवळी, श्री प्रकाश महाले यांच्यासह आदी मान्यवरांची या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती तर जिल्हाभरातून तरुण युवक युती यांनी देखील या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने आपली उपस्थिती दर्शविली एम.पी.एस.सी यू.पी.एस.सी, एस.टी.आय, इंडियन नेव्ही, याचा इतरही गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उपस्थित मान्यवरांच्या पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

0 9 3 7 1 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *