खुटवडा ग्रामपंचायत च्या सरपंच उपसरपंच सह ग्रामस्थांनी गटविकास अधिका-यांना दिले निवेदन.

Khozmaster
2 Min Read

ग्रामसेविकेचं मनमानी कारोभार

प्रविण चव्हाण नंदुरबार -: धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खुटवडा ग्रामपंच्यायतीत कार्यरथ असलेल्या ग्रामसेविकेच्या मनमानी कारभाराला कंटाळुन अखेर सरपंच, उपसरपंच, सदस्य,व गावातील ग्रामस्थांसह गटविकास अधिकारी पंचायत समीती धडगांव तालुका अक्राणी जि.नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले.   ग्रामपंचायत खुटवडा येथिल कार्यरत असलेल्या ग्रामविकास अधिकारी ह्या ग्रामपंचायत च्या प्रमुख असलेल्या सरपंच व उपसरपंच व सदस्य यांचे मासिक सभा असो की ग्रामसभा कुठलीही विकास काम ऐकुन घेत नाही.खुटवडा हे गांव अतिदुर्गम भागात असल्यामुळे ग्रामस्थांना खाजगी वाहनातुन प्रवास भाडे देवुन शैक्षणिक दाखले व तत्सम कामासाठी धडगांव येथे ग्रामपंचायत कार्यालयात येत असतात. पण एकीकडे ग्रामविकास अधिकारी कार्यालयात हजर नसतात.कोणत्याही शैक्षणिक कामासाठी लागणा-या दाखल्यांवर सही घेण्यासाठी आठवडाभर ग्रामस्थांना कार्यालयात चकरा माराव्या लागतात. ग्रामविकास अधिकारी याला मोबाईल फोन द्वारे संपर्क केले असता.मोबाईल नेहमी बंद येत असते. ग्रामस्थ प्रत्येक्षा कामासाठी कार्यालयात जात असता तेव्हा कार्यालयात ग्रामविकास अधिकारिंच्या खुर्चिवर ग्रामसेविकेचे पती बसलेले असतात ग्राम पंचायत कार्यालयातील संपुर्ण कारोभार सांभाळत असतात व स्वतः सही शिक्के देत असतात असा गंभिर गैर प्रकार आढळुन आला .  सदर प्रकारा बदल विचारपुस केली असता उडवा- उडवीची व असामाधान कारक उत्तरे ग्रामस्थांना मिळत असतात. ग्रामस्थांनी पाच वर्षात विविध विकास कामांसाठी जनतेच्या विश्वासातुन गावाचे प्रमुख म्हणुन सरपंचाला निवडुन आणतात.पण सरपंचाची या ग्रामविकास अधिकारी शुन्य ही ऐकेना कुणा राजकीय पुढा-यांच्या आर्शिवादाने खुटवडा ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिका-यांचे मनमानी कारभार तर चालतं नाही ना ? असा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे.   अशा ग्रामपंचायत प्रमुखांची कामे न करुन देणा-या व सर्वसामान्य ग्रामस्थांची वेळेवर काम न करणा-या ग्रामविकास अधिकारीची तत्काळ बदली करुन नविन ग्रामविकास अधिकारीची नेमणुक करावी असे निवेदनात नमुद करण्यात आले.   यावेळी मीना संभाजी पावरा, सरपंच ग्रा.प. खुटवडा, शेवंती माक्या पावरा, ग्रा.प.उप सरपंच,वसंत जामसिंग पावरा, ग्रा.प.सदस्य,जिंगा आट्या पावरा ग्रा.प. सदस्य,विध्या दारासिंग पावरा ग्रा.प. सदस्य,शिवाजी पावरा, खात्र्या पावरा,दारासिंग पावरा,रायसिंग पावरा,मोचडा पावरा.शंकर पावरा, तुकाराम पावरा कीसन पावरा , संभाजी पावरा आदि ग्रामस्थ निवेदन देते वेळी उपस्थित होते.

 

0 9 3 7 5 0
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *