मंठा तालुक्यातील रखडलेल्या विकास कामासंदर्भात शिवसेना नेते खासदार किर्तीकर यांच्याशी उदयसिंह बोराडे यांची चर्चा l

Khozmaster
1 Min Read

गजानन माळकर

जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा जालना जिल्ह्यातील मंठा तालुका हा भौगोलिक दृष्ट्या मागासलेला तालुका आहे.तालुक्यातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी शिवसेनेचे शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष उदयसिंह बोराडे यांनी शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्याशी तालुक्यातील रखडलेल्या विकास कामा संदर्भात चर्चा केली.व तालुक्याचा अनुशेष भरून काढण्याची विनंती केली.

दि.16 एप्रिल रविवार रोजी गजानन किर्तीकर यांनी जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची जालना येथे बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी तालुका अध्यक्ष उदयसिंह बोराडे यांनी मंठा तालुक्याच्या वतीने त्यांचे स्वागत केले.आणि मंठा तालुक्यातील रखडलेली विकास कामे आणि तालुक्यातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासंदर्भात नव्याने करावयाची विकास कामे या संदर्भात किर्तीकर यांच्याशी चर्चा केली.

यावेळी.या बैठकीला शिवसेना उपनेते अर्जुन भाऊ खोतकर, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान जी भुमरे, आभिमन्यु दादा खोतकर, संपर्क प्रमुख पंडीत दादा भुतेकर, जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल,जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, मंठा शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी शहरप्रमुख माउली नाना बोराडे, जेष्ट शिवसैनिक उध्दव मामा खरात,शिवसेना तालुका प्रमुख उदयदादा बोराडे, विवेक भुतेकर यांची उपस्थित होती.

 

0 9 3 7 5 4
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *