बैठकीत शांतता पाळण्याचे आवाहन करण्याची वेळ पोलिसावर येऊ नये.पोलीस अधीक्षक.बच्चन सिंग
प्रतिनिधि महादेव तायडे कारंजा. सध्या मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे या महिन्यात मुस्लिम बांधव महिन्याभर उपवास ( रोजा ) ठेऊन आपल्या पवित्र नमाजाचे पठन उत्साहने करतात. दर वर्षी प्रमाने या वर्षी सुद्धा कारंजा शहर पोलिस स्टेशन तर्फे इफ्तार पार्टी चे आयोजन कारंजा येथील महेश भवन येथे करण्यात आले होते या कार्यक्रमा चे अध्यक्षस्थानी पोलीस जिल्हा अधीक्षक बच्चन सिंग हें होते तर प्रमुख उपस्थितीत होम डी वाय एस पी कार्तिका मॅडम, उप विभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, पोलीस नीरोक्षक आधारसिंग सोनोने, अरविन्द लाठिया तसेच शहरे काजी इक़बाल मौलाना,व नगीना मस्जिद चे मौलवी हजर होते. सर्वप्रथम मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व नंतर इफ्तार पार्टी सुरु करण्यात आली त्यानंतर शहरातील सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,राजकीय कार्यकर्ते यांनी आपले विचार मांडले.यावेळी अध्यक्षशीय भाषनात जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी बैठकीत सर्वानी शांतता का पाळावी या विषयाची चर्चा व्हायला नको कारण बैठकीत येणारे सर्व जण शहरातील शांतता कायम ठेवण्यासाठी उत्तम कार्य करणारे मान्यवर असतात केवळ ओपीचारिक्ता म्हणून आपण वागणे सोडले पाहिजे समाजात जे काही विघ्न संतोषी लोक असतात त्यांना आवर घालणे समाजातील प्रत्येक जाणकारांनी समजदार माणसाची कर्तव्य आहे आपण सारे समाजात काम करणारी जबाबदार पदाधिकारी राजकीय कार्यकर्ते पत्रकार धार्मिक कार्यकर्ते असल्याने आपण अशा लोकांचा बंदोबस्त करून पोलिसांना सहकार्य केले पाहिजे आणि शहरातील शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम आपल्या हातून झाले पाहिजे असे मनोगत इफ्तार पार्टीचा बैठकीत व्यक्त केले. तरच बैठक उत्तम असेल असा थेट प्रश्न केला कारण प्रत्येक समाजात शांततेत सन उत्सव साजरा करा असे म्हणतात आणि शांतता पाळणे ही प्रत्येकाची नैतिक जवाबदारी आहे.प्रत्येक समाजा मध्ये समाज कंटक असतात तरी सर्वानी सर्व उत्सव शांतते ने साजरे करुण पोलिस प्रशासनला सहकार्य करावे असे आवाहन अधीक्षक बच्चन सिंग यांनी केले, तसेच येणाऱ्या रमजान ईद निमित्य सर्वाना सुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सर्वधर्म आपतकालीन सस्थाचे अध्यक्ष श्याम सवाई यांनी तर आभार पोलीस नीरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी केले या वेळी इफ्तार पार्टीत मुस्लिम बांधव, सर्व समाजाचे सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार, महिला समिति प्रतिनिधी,मोठ्या संख्येने हजर होते.
Users Today : 23