शिवम भारतीय नेव्हीमधे भरती झालेला लोणी येथील पहिला तरुण..
रिसोड प्रतिनिधी :-* तालुक्यातील श्रीक्षेत्र लोणी बुद्रुक येथील शिवम रामदास चनखोरे हा अवघ्या अठरा वर्षांचा वर्ग बारावी मधे शिकणारा शिवम रामदास चनखोरे याला भारतीय नेव्ही मधे भरती होण्याची लहानपणापासुंनच ईच्या होती त्यात घरची परिस्थिती हलाखीची असताना आपल्या आई वडिलांच्या मेहनतीचं फलित करण्यासाठी तो पुणे येथील प्रा डॉ एस एस सोनवणे सर यांच्या गरुड झेप अकॅडमी मधे जॉईन झाला आणि अवघ्या काही दिवसांतच त्याने आापल्या चिकाटीने भारतीय नेव्ही मधे भरती होऊन आपल्या आई वडिलांचे तसेच त्याला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे, आपल्या गावाचे आणि गरुडझेप अकॅडमी चे नाव रोशन केले गरुडझेप अकॅडमी ने आजपर्यंत हजारो नव युवकांना विविध प्रकारच्या पदावर पोचवले शिवमचा लोणी बु येथे गरुड झेप अकॅडमी तसेच गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी डॉ एस एस सोनवणे संस्थापक अध्यक्ष गरुडझेप अकॅडमी,तसेच प्रा किशोर सर क्रीडा विभाग प्रमुख, प्रा पाटील सर,मुंढे,तसेच लोणी बुद्रुक चे सरपंच राजू चौगुले,पोलीस पाटील अंबादास दीक्षे, विनोद बोडखे ,प्रवीण बोडखे भागवत बोडखे आदी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शर्मा महाराज,पंडित देशमुख,गोविंद सानप, सखाराम सानप,विजय दळवे,दीपक बोडखे यांच्यासह अनेक नव युवकांनी सहकार्य केले..
Users Today : 22