एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी..

Khozmaster
1 Min Read

प्रविण चव्हाण

नंदुरबार- : शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये शासन अनुदानित, अनुदानित अल्पसंख्याक, खाजगी विनाअनुदानित आणि विनाअनुदानित अल्पसंख्याक महाविद्यालयांचे प्रवेश तसेच अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2023 (एमएचटी-सीईटी) 9 मे 2023 ते 21 मे 2023 या कालावधीत घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यासाठी सामायिक परीक्षा ही डी.एन.पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, शहादा (लोणखेडा परिसर) या केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने सकाळी व दुपारी या दोनसत्रात घेण्यात येणार आहेत. या कालावधीत परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात सकाळी 7-00 वाजे पासून ते संध्याकाळी 6-00 वाजे पर्यंत कोणीही प्रवेश करु नये.

सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत, असे ही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *