वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर* ; रिसोड तालुक्यातील कोयाळी बुद्रुक येथील पंचशील महिला मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६७ वी जयंती मोठे उत्साह मध्ये साजरी करण्यात आली आहे. या वेळी पंचशील धम्म ध्वज रॅली काढण्यात आली. त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी गावातील बौद्ध उपासक तथा उपासिका व महिला मंडळी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन चरित्रावर गीत गायन केले. यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन चरित्रावर माहिती दिली. यावेळी संजना सदार अनिता सावळे,सुनिता सावळे ,माया आराख,रजनी आराख
,मीनाक्षी जावळे, अनिता पनाड,ज्योती सदार ,गयाबाई पडघान ,कांताबाई सोनुने,
शोभाबाई प्रधान,जया आराखं, शांताबाई आराख यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना सदार यांनी केले तर आभार अनिता सावके यांनी मानले. यावेळी खीरदान वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. गावातील बौद्ध उपासक उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Users Today : 22