वाशिम प्रतिनिधी ;
वाशिम – दि.६ मे रोजी, वाशिम येथून जवळ असलेल्या केकत उमरा येथील रहिवासी खंदुजी कष्टे व गणेश भारत हरिमकर यांच्या घराच्या व गोठ्याच्या कुंपणावर भुरक्या व काळ्या रंगाचा साप हा सायंकाळच्या सुमारास ७ :०० वाजता दिसून आल्याने एक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या सापांनी पोटामध्ये काहीतरी गीलेले असल्याची माहिती यावेळी त्यांनी सर्पमित्राला दिली होती. काही क्षणामध्येच या ठिकाणी प्राचरण करण्यात आलेल्या सर्प प्रदिप पट्टेबहादुर यांनी बघताच सांगितले की हा भारतीय नाग जातीचा विषारी साप आहे. त्यांनी या सापाला गोट्याच्या बाजूला काढून या भारतीय नाग जातीच्या सापाने आपल्या भुकेच्या शोधामध्ये त्यांनी उंदीर गिळलेला आहे अशी माहिती दिली. यावेळी पर्यावरण प्रेमी वन्यजीव रक्षक सर्प मित्र प्रदीप पट्टेबहादुर यांनी या सापाला मोठ्या सीताफिने पकडून निसर्ग वनामध्ये सोडण्यात आले..
Users Today : 22