वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर
स्थानिक ; श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय येथे विद्यार्थी विकास व स्टुडन्ट फोरम यांच्यावतीने उच्च शिक्षण व समाजकार्य शिक्षणासाठी करियरच्या संधी याविषयी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर वाहने तर प्रमुख मार्गदर्शक संदेश रामराव राठोड (विद्यार्थी,अजीम प्रेमजी विद्यापीठ बेंगलूरू ) होते.कार्यक्रमाचे आयोजन प्रा. पंढरी गोरे (विद्यार्थी विकास अधिकारी )यांनी केले. प्रस्ताविकातून त्यांनी कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पस्ट केला.
संदेश राठोड यांनी समाजकार्य शिक्षण आणि करियरच्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समाजकार्याचे शिक्षण देणाऱ्या भारतातील विद्यापीठ व त्यातील शिकविले जाणारे समाजकार्यशी संबंधित अभ्यासविषय याची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा त्यांचे स्वरूप व करावयाची तयारी याविषयी त्यांनी विद्यार्थ्यासोबत चर्चात्मक पद्धतीने संवाद साधला.विविध फेलोशिप, स्कॉलरशिप, तसेच विद्यार्थ्यांसाठी त्यांनी उपयुक्तातता याविषयी सखोल मार्गदर्शन केले. इंग्रजी भाषा आणि त्याबद्दल असलेली अनावश्यक भीती दूर करण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समाजकार्य शिक्षण आणि त्यासाठी असलेल्या कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी आणि त्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य याविषयी विद्यार्थ्यासोबत सुसंवाद साधला. विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित करून त्यानुसार नियोजक करावे व समाजकार्यातील संधी प्राप्त कराव्या असे विद्यार्थ्यांना सांगितले. प्रश्नोतरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.या कार्यक्रमामध्ये अभय काळे, योगेश उजवने,साक्षी लबडे,श्रावणी राजणकर,आकाश जावळे, आरती शृंगारे,बजरंग माघाडे, माधुरी भगत,दिक्षा तायडे, मेघा ढोले, दीपाली लांडगे, स्वरूपा इहरे ,संगीत राठोड, विशाल कव्हर,रेणुका सुरकुंडे, आदी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
Users Today : 22