रिसोड प्रतिनिधी,
रिसोड तालुक्यातील हिवरा पेन गावातील सुधाकरराव रुस्तमराव सरनाईक या शेतकऱ्यांचा दि.९/५/२०२३ रोजी अंदाजे किंमत ६५ते ७० हजार रु.चा बैल साप चावल्याने मृत्युमुखी पडला.असं संबंधित शेतकऱ्यांने सांगितले. शेतकरी अगोदरच आस्मानी व सुलतानी संकटांनी संकटात सापडला असून त्याच्यावर बैल मृत्युमुखी पडल्याने येणाऱ्या पेरणीच्या हंगामात काय करावे हे समजेनाचे झाले, यासाठी तहसीलदार मॅडम, रिसोड यांच्या महसूल विभागाने बैल मृत झाल्याचा पंचनामा करुन आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत या शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी व शेतकऱ्याला संकटातून सावरण्यासाठी शासनाने प्रयत्न करावा व या शेतकऱ्याला दिलासा द्यावा. अशी मागणी या शेतकऱ्याने केली असून शेतकऱ्यास दिलासा मिळेल अशी अपेक्षा..
Users Today : 17