बालविवाह करणाऱ्यांनो सावधान ! जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांची असेल तुमच्यावर बारीक नजर….

Khozmaster
4 Min Read

प्रविण चव्हाण

नंदुरबार -: तालुक्यातील ढंढाणे येथील बालविवाह पोलीसांनी रोखला.

अधिक माहिती अशी कि, बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाय योजना करणे या उद्देशाने नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून “ऑपरेशन अक्षता” हा उपक्रम यावर्षी 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दला तर्फे सुरु करण्यात आला आहे.

दिनांक 10 मे रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील नंदुरबार यांना बातमी मिळाली की, मेथी ता. शिंदखेडा जि. धुळे येथील एका अल्पवयीन मुलीचा ढंढाणे ता. नंदुरबार येथील एका मुला सोबत विवाह दिनांक 10 मे 2023 रोजी होणार आहे अशी माहिती मिळाली.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक पाटील यांनी सदरची माहिती नंदुरबार तालुका पोलीस निरीक्षक राहुल पवार यांना कळवून पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता समिती मार्फत सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करणे बाबत आदेशीत केले.

पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता समिती सदस्यांच्या मदतीने बालविवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीची माहिती काढली असता ढंढाणे ता. नंदुरबार येथे एका ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम सुरु असल्याचे दिसून आले. म्हणून अक्षता समितीच्या सदस्यांनी तेथे हजर असलेल्या वर मुलाकडे व त्याच्या कुटुंबियांकडे मेथी ता. शिंदेखेडा जि. धुळे येथील वधू मूली बाबत विचारपूस केली असता वधू मुलगी ही त्याठिकाणी हजर होती. विवाह होण्याच्या आधीच सदर समिती सदस्य त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी त्यांना वधू मुलीच्या जन्म तारखे बाबत विचारपूस केली असता मुलीचे वय (17) वर्षे (04) महिने असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अक्षता समितीने तेथे हजर असलेल्या वधू, मुलगा व त्याच्या नातेवाईकांना तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांसोबत चर्चा करुन त्यांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई करण्यात येते याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन त्यांचे मनपरिवर्तन केले. तसेच अल्पवयीन मुलगी व तिच्या नातेवाईकांना नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय (18) पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.

सदर बालविवाह रोखण्यासाठी ढंढाणे ता. नंदुरबार येथे गेलेल्या अक्षता समितीकडून तेथील उपस्थित लोकांना व परिसरातील आजूबाजूच्या लोकांना बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम समजावून सांगून लोकांमध्ये बालविवाह विषयी जनजागृती करण्याचे काम ऑपरेशन अक्षता समितीकडून वेळोवेळी केले जात आहे.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन अक्षता अंतर्गत अक्षता समितीच्या माध्यमातून बालविवाह थांबविण्यात यश आले आहे. ऑपरेशन अक्षता या उपक्रमास जनजागृतीच्या माध्यमातून यश येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यात यश येईल असे, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.

“ऑपरेशन अक्षता” हा उपक्रम यावर्षी 8 मार्च 2023 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु करण्यात करण्यात आला असून आज पावेतो नंदुरबार जिल्ह्यातील 615 ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आले आहेत.

तसेच उर्वरीत ग्रामपंचायतींचे ठराव देखील लवकरच घेण्यात येतील.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्हा प्रमुख पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, पोलीस हवालदार सामुद्रे, पोलीस नाईक मनोज चव्हाण, पोलीस शिपाई सचिन सैंदाणे, राठोड अशांनी केली आहे.

0 9 3 7 6 2
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *