गरोदर विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Khozmaster
1 Min Read

गजानन माळकर

जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.

मंठा तालुक्यातील अंभोडा कदम येथील वर्षा आकाश चव्हाण (वय २८) या विवाहितेने सासरकडील

नातेवाइकांच्या त्रासाळा कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (दि. १९) ही घटना घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, वर्षा चव्हाण हिला तिचा पती आणि सासरचे लोक तू आम्हाला पसंत नाही असे म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देत होते. तसेच ती चार महिन्याची गरोदर असताना देखील तिला गर्भपात करण्यासाठी मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या देत होते.

या छळास कंटाळून वर्षा हिने आज राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

याप्रकरणी मृत वर्षा यांचे वडील मोहन बंडू राठोड (रा. चिखली तांडा) यांच्या फिर्यादीवरून तिचा पती आकाश चव्हाण, सासू दिर निखिल चव्हाण, ननंद व मावस सासरा लक्ष्मण पवार, मावस सासू, मावस दीर बाळू पवार व त्याची बायको यांच्याविरुद्ध मंठा पोलिस ठाण्यात कलम 304 (ब), 498 (अ), 323, 504, 506, 34. भाद वि, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बी. पी. राऊत अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *