
*जंगली जनावरांच्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार*
*अल्पभूधारक शेतकऱ्यावर संकटाचे सावट*
प्रतिनिधी विशाल गवई
हिवरखेड येथील वार्ड क्रमांक 4 खडकी परिसरातील रहिवासी संदीप रमेश कुऱ्हाडे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या गावालगतच गोठ्यात 6 शेळ्यांची शिकार वन्य प्राण्याने केल्याची दुर्दैवी घटना दिनांक 14 जून रोजी पहाटे घडली असल्याचे चित्र दिसून आले.
माहिती मिळताच तात्काळ वनविभागाचे वनरक्षक आतिफ हुसेन, तलाठी तेलगोटे, पशुवैद्यकीय अधिकारी दांडळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील इंगळे, यांनी घटनास्थळी पाहणी केली असता सर्व मंडळी कडून जंगली जनावराणे शिकार केली असल्याची माहिती मिळाली असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही दिवसा अगोदर याच परिसरातील शेतकरी अनील रमेश पोके यांच्या गाईच्या 3 वासरांची सुद्दा शिकार झाली असल्याची माहिती त्यांनी सांगितली.
अगोदर शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागत आहे त्यात एकूण 6 बकऱ्यांची शिकार झाल्याने सदर शेतकरी हवालदिल झालेला आहे. याकडे वन विभागाने तात्काळ लक्ष देऊन या शेतकऱ्याला मदत मिळून द्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे ….
Users Today : 11