अभियान..
हरघर तिरंगा लावा
हवीअंतरी आसक्ती
उस्फुर्त महोत्सव हो
कुणी ना करे सक्ती
माझादेशमाझीमाती
सळसळो उर्जा रक्ती
वसुधा नंदन उपक्रमे
अंकुरली देश भक्ती
पारतंत्र्य साखळदंडी
सहज न मिळे मुक्ती
पंचप्रण सार्थ शपथ
विश्वभर भरे व्याप्ती
जाण शहीदबलिदान
कशी फाकली दिप्ती
शिलालेख गावोगावी
वीरनावे गोंदवे वरती
ऐका वाचा इतिहास
ती एकात्मता शक्ती
सत्याग्रह न् आंदोलने
मशाल ती धगधगती
काय करायचेयं मला
कशास अशी विरक्ती
वेळ आली करा कृती
नको वायफळ उक्ती
भारतमाता स्वतंत्रता
विराजे हृदया तख्ती
जोश होश दोन्ही हवे
सामील हरेक व्यक्ती
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
www.kavyakusum.com
Users Today : 1