तोरणमाळ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यूने खळबळ..

KHOZ MASTER
2 Min Read

प्रविण चव्हाण नंदुरबार -: मुख्याध्यापकसह कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाईची मागणी…नंदुरबार -: धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथील शासकीय आश्रम शाळेत पहिलीत शिक्षण घेणाऱ्या डेबा दिला तडवी (वय ७ ) या विद्यार्थ्याचा आश्रम शाळेत अचानक मृत्यू झाल्याने शाळेत खळबळ उडाली आहे. नातेवाईकांनी आश्रम शाळेचा मुख्याध्यापकसह कर्मचाऱ्यांवर विरोधात आक्रोश केला आहे.

आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत तोरणमाळ येथे शासकीय आश्रम शाळा आहे येथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे शिकणाऱ्या शहादा तालुक्यातील साबलापाणी येथील आमदारपाडा येथील डेबा दिला तडवी (वय ६) विद्यार्थाला दोन दिवसा पासून पोट फुगत असल्याचा त्रास जाणवत होता . मंगळवारी दुपारी चार वाजे पर्यंत डेबा तडवी हा विद्यार्थी झोपेतून उठत नसल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

परंतु स्थानिक आश्रम शाळेतील शिक्षकांचा दुर्लक्षामुळे विद्यार्थ्याचा आश्रम शाळेत झोपतच मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाल्याने नातेवाईकांनी आश्रम शाळेतील मुख्याध्यापकसह कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाईचा पवित्रा घेतला होता. घटना होऊन एक दिवस उलटून देखील जबाबदार अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला होता.

सुमारे २१ तास उलटल्यावर सहायक प्रकल्प अधिकारी के. सी कोकणी यांनी तोरणमाळ घटना स्थळी भेट देत संबधित मुख्याध्यापक कर्मचारी यांची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

तसेच शासन मार्फत मयत विद्यार्थाचा पालकाला दोन लाख रुपयांचे अनुदानाची तरतूद करून तात्काळ देण्यात येईल या नंतर सुमारे २१ तासा नंतर शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यातआला.

पोलिसांचा बंदोबस्त.

घटनास्थळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी म्हसावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनलेश जायसवाल, नागझिरीचे येथील उपसरपंच रामदास पावरा, नाथा भील, भरत पावरा, छगन भिल, मोहन वळवी, गुलाबसिंग भिल, तेरसिंग पावरा, बाय पाडवी, जगन मोरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

0 9 7 1 9 5
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *