प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज चंद्रपूर लोकसभा प्रवासावर* • भाजपाच्या लोकसभा प्रवासाचा शुभारंभ करणार • घर चलो, संपर्क से समर्थन अभियान, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद • वणी येथे दुपारनंतर बैठक

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी अमित वानखडे  भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या राज्यव्यापी लोकसभा प्रवासाचा शुभारंभ उद्या २० ऑगस्टपासून चंद्रपूर येथून करणार आहेत. त्यांच्या एक दिवसीय प्रवासात ते चंद्रपूर लोकसभेतील सर्व 6 विधानसभांचा आढावा घेतील व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.  सकाळी 11.00 वा. तूकुम परीसतील दिवाकर प्रिंटिंग प्रेसपासून कार्यालयापर्यंत‘संपर्क से समर्थन’ अभियानाने दौऱ्याचा प्रारंभ करतील. दुपारी 1 वा. बुरूडकर सभागृहात वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर व राजुरा या विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत मार्गदर्शन करतील. दुपारी 4.30 वाजता वनी शहरातील शिवाजी चौक परिसरात पक्षप्रवेश कार्यक्रमात उपस्थित राहतील. सायंकाळी 5 वाजता टिळक चौकात घर चलो अभियानात सहभागी होतील.

वणी येथे दुपारनंतर बैठक

सायंकाळी 5.30 वा ते वणी व आर्णी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करतील. यासोबतच ते या प्रवासात काही महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी घेणार आहेत.

प्रदेश अध्यक्षांच्या प्रवासाचे नियोजन व तयारी स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्ष, लोकसभा संयोजक, लोकसभा निवडणूक प्रमुख, विधानसभा निवडणूक प्रमुख व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करणार आहेत.

 

0 9 4 6 4 0
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *