परखड ..

Khozmaster
1 Min Read

परखड ..

 

खाण्याचे ठेले टाका

उडेल जोरात झुंबड

चविष्ट वेगळे पदार्थ

फायदा होईलं रग्गड

 

घरात स्वयंपाकाला

असते कुणास सवड

खवय्येगिरी चालली

नवीनखाण्यां आवड

 

बदलती कायम टेस्ट

करी चोखंदळ निवड

आकर्षक प्रेझेन्टेशन

रचून ठेवायची चवड

 

मशीन कमावते पैसा

आठवडाभर धड पड

अन्नाची होते चिवड

चाललेली कुत्तरओढ

 

घासाचीढकलाढकल

पोटाची चाले परवड

कमवितो पोटा साठी

आयुष्य बनते खरवड

 

बा कालाय तस्मै नमः

नको बंधनाची जखड

स्विकारता नवा बदल

व्हायला हवे परखड

 

– हेमंत मुसरीफ पुणे.

9730306996.

www.kavyakusum.com

 

0 9 4 2 4 4
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *