खान्देश दिगम्बर जैन समाजाचा रविवारी कुसुंब्यात भव्य मेळावा : उपस्थित राहण्याचे सुरेश जैन यांचे आवाहन..

KHOZ MASTER
2 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण  नंदुरबार -: धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील प्राचीन जैन अतिशय क्षेत्रावर येत्या 17 सप्टेंबर रविवार रोजी 20 व्या शतकातील प्रथमचार्य आचार्य श्री 108 शांतीसागर महामुनी श्री यांची 68 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन दिगंबर जैन सोशल ग्रुप

फेडरेशनचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष व दिगंबर जैन महासभेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश जैन यांनी केले आहे.

 

या मेळावा संदर्भात अधिक माहिती देताना सुरेश जैन यांनी म्हटले आहे की, आचार्य श्री 108 शांतीसागर महामुनी श्री यांचे दिगंबर जैन समाजावर असलेल्या उपकारांची उतराई त्यांचा गुण अनुवाद त्यांना आदरांजली म्हणून हा महोत्सव साजरा होणार आहे तसेच या महोत्सवाचे औचित्य साधून जैन समाजाचे एकीकरण, सर्वांगीण विकास, जैनत्व वर्धन व अहिंसा धर्म प्रभावना या उद्देशाने दिगंबर जैन समाजाचा मेळावा खान्देश समाजाच्या सहभागानेच मुख्य कार्यक्रम कुसुंबा येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी लहान्यापासून थोरांपर्यंत पार्श्वनाथ जैन सेवा प्रतिष्ठान तसेच पद्मावती युवा मंच, सकल दिगंबर जैन समाज जोमाने करित असल्याची माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धी प्रमुख आणि प्राचीन जैन अतिशय क्षेत्राचे विश्वस्त सतीश वसंतीलाल जैन आणि महेंद्र हिरालाल जैन यांनी दिली. या क्षेत्रावर चातुर्मास स्थीत असलेले आचार्य श्री 108 पवित्र सागरजी महाराजजींचे परम प्रभावी शिष्य मुनि श्री प्रभावसागर महाराजजी आणि मुनि श्री प्रभातसागर महाराजजी युगल मुनिच्या सानिध्यात धर्म संस्कार, व्रत संस्कार, जैन समाज सम्मेलन, आचार्य शांतीसागर महाराज पुण्यतिथी, भव्यशोभा यात्रा, मंगल प्रवचन तसेच धर्म चर्चासत्र आदि कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

या सम्मेलन महोत्सवास खान्देशातून बहुसंख्य समाज बांधवाची उपस्थिती लाभणार

असल्याचा प्रथम अंदाज आहे. येणाऱ्या श्रावक व श्राविकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मार्गदर्शक म्हणून प्रतिष्ठाचार्य श्री प्रदीपकुमार मधुर शास्त्री यांचे मार्गदर्शन मिळत आहे. महोत्सव यशस्वीतेसाठी पार्श्वनाथ सेवा समितीचे पद्मावती युवा मंच व समाज बांधव विशेष परिश्रम घेत आहेत. असेही सुरेश जैन यांनी कळविले आहे.

 

0 9 7 1 9 5
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *