वाशिम जिल्हा सह राज्यातील सर्पमित्र / प्राणी मित्र यांना अपघाती विमा व सर्पदंश उपचार मोफत करा तथा अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करा..

Khozmaster
3 Min Read

वाशिम प्रतिनिधी – मुख्यमंत्री यांच्याकडे आमदार लखन मलिक यांच्या पाठिंबासह वन्यजीव रक्षक सर्पमित्र प्रदिप पट्टेबहादुर यांची मागणी.दि.१० सप्टेंबर, – गावापासून ते शहरांमध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यात घराघरात ऑफिस, शेत, गोठे अशा मानवाच्या व पाळीव प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणी विषारी व बिल विषारी साप आढळून येत असतात. साप दिसता वेळेस बघितला तर भीतीचे वातावरण निर्माण होते. विषारी सापाच्या दंशामुळे जीवित वित्तहानी चा धोका संभावतो बरेचदा हे अपघातने व अनावधानाने किंवा सापण विषयक अज्ञानामुळे घडवून येत असते. शिवाय बऱ्याचशा ठिकाणी वरील सांगितल्या सारख्या घटनांमुळे अज्ञान व भीतीपोटी कितीतरी सापांची दिसताशनि निर्गुण हत्या केली जाते. त्यापैकी बरेच साप बिनविषारी पण असू शकतात. दोन्ही प्रसंगातून तळागाळातील निष्ठावंत सर्पमित्र आणि प्राणी मित्र हे वेळोवेळी धोका पत्करून आपल्या कौशल्याचा उपयोग करून तात्काळ घटनास्थळी हजर होतात . व असे विषारी व बिनविषारी साप पकडतात.लगेच त्याला जंगलामध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सोडतात अशा महत्त्वाच्या समाज योगी व मानव आणि साप यांच्या विध्यांमध्ये जीवाचे रक्षण करण्याचे महान कार्य हे सर्पमित्र आणि प्राणी मित्र पूर्ण निष्ठतेने निस्वार्थ पने अहोरात्र करत असतात. मात्र साप हा मानवी साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. अशा या घटक केवळ शेतकऱ्यांनाच नाही. तर साप संपूर्ण मानव जीवाचा मित्र आहे. तो नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी सापाप्रमाणे सर्व सर्पमित्रांना प्राणी मित्रांना सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे.

साप आणि प्रत्येक वन्यजीव जरी मोलाचा असला तरी, सर्पमित्र हा लाखमोलाचा आहे. अशा या सर्पमित्रांना प्राणी मित्रांचा आपत्कालीन परिस्थितीमध्ये रस्त्यावरील वाहनांच्या अपघात असो किंवा सर्प दंश व त्यामुळे होणारे मृत्यू यांसारखे धोके कोणत्याही क्षणी येऊ शकतात त्यामुळे सर्पदंश किंवा अपघातशनी मृत्यू झाल्यास त्यांना अपघात विमा आणि (प्राणी मित्र विमा) योजने अंतर्गत त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रु १० लाख रुपये अपघाती विमा मंजूर करण्यात यावा.

सर्प मित्र / प्राणी मित्र हे सहसहा मध्यम किंवा गरीब वर्गातील आहेत. अशा प्रसंगी अपघात व सर्पदंश होताच मोठ्या खर्चाची पूर्तता करणे त्याला शक्य नसते म्हणून त्यांना अपघात झाल्यानंतर उपचार दरम्याने आर्थिक अर्थशास्त्राची अत्यंत गरज असते त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व सर्पमित्र व प्राणी मित्र यांना आरोग्य विमा मध्ये समाविष्ट करणे याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वाशिम मंगरूळपीर मतदार संघाचे आमदार लखन मलिक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ही पर्यावरण प्रेमी वन्यजीव रक्षक सर्पमित्र प्रदिप पट्टेबहादुर, गोपाळ बोरचाटे, सुमेध तायडे, यांनी सर्पतज्ञ मार्गदर्शक डॉ.संजय नाकाडे, प्राणीमित्र डॉ.श्रीधर कंदी अनुभवी सर्पमित्र सर्प अभ्यासक विजयराज पाटील, बाळू ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार लखन मलिक यांच्या पाठिंबासह मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.

 

0 9 3 7 1 1
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *