Nashik Leopard: सिडकोच्या दाट वस्तीत बिबट्या शिरला, बघता बघता फ्लॅटमध्ये घुसला, नागरिकांची तोबा गर्दी

Khozmaster
1 Min Read

नाशिक : नाशिकमधल्या सावतानगर परिसरात सकाळी सात वाजेपासून गल्लीबोळामध्ये बिबट्याचा वावर बघायला मिळाला आहे. संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाचे पथक सावतानगर परिसरात दाखल झाले आहे. लोक वस्तीचा परिसर असल्यामुळे नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौज फाटा ही दाखल झालेला आहे. त्याचदरम्यान, गोविंद नगर परिसरात सिडकोच्या दाट वस्तीत अजून एक बिबट्या आढळून आला आहे. हा बिबच्या अपार्टमेंट शिरुन एका फ्लॅटमध्ये घुसला आहे.

0 9 4 8 0 5
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *