बुलढाणा, दि. १६ (प्रतिनिधी)
…………………………
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे इंग्रजीचे प्राध्यापक दिलीप चव्हाणलिखित ‘डॉ. आंबेडकर आणि शिक्षणातील जातिसंघर्ष’ या ग्रंथावर चर्चा व प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दर्जेदार दिवाळी अंक प्रदर्शन उद्या १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आले आहे.
शाहूनगरमधील प्रगती वाचनालयात हे प्रदर्शन भरणार आहे. उद्घाटन प्रा.डॉ. दिलीप चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे अध्यक्ष प्रा.डॉ. संतोष आंबेकर राहणार आहेत. तसेच गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ. संतोष सुरडकर हे भाष्य करणार आहेत. ग्रंथचर्चा व दिवाळी अंक प्रदर्शनाला वाचक, रसिक व श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रगती वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, आंबेडकरी साहित्य अकादमी, अक्षरदेह नाट्यसंस्था, लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
राजकीय भाषाविज्ञान हे प्रा.डॉ. दिलीप चव्हाण अभ्यासक्षेत्र आहे. शिक्षण : जातवर्गीय वास्तव आणि समतावादी पर्याय, फुले – शाहू -आंबेडकर आणि जातिव्यवस्था अंत, स्त्री शिक्षणाचा संघर्ष, डॉ. आंबेडकर आणि भारतीय शिक्षणातील जातिसंघर्ष’ साम्राज्यवाद : भाषा आणि संस्कृती, समकालीन भारत : जातिअंताची दिशा, जातवार जनगणना कशासाठी आणि कोरोना आणि स्त्री-पुरुष विषमतेचा प्रश्न ही त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके आहेत. दोन नियतकालिकांचे ते कार्यकारी संपादक आहेत.
बुलढाण्यात आज ग्रंथ प्रदर्शन, दिवाळी अंक प्रदर्शन (फोटो)
0
9
4
7
9
8
Users Today : 38
Leave a comment