मुंबईकरांनो उद्या बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा, मध्य-हार्बरवर देखभाल-दुरुस्ती; पाहा वेळापत्रक

Khozmaster
1 Min Read

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर शनिवारी सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. यामुळे चर्चगेट ते विरार डहाणू रोडदरम्यान रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.मध्य रेल्वे

स्थानक : सीएसएमटी ते विद्याविहार

मार्ग : अप आणि डाऊन धीमा

वेळ : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५

परिणाम : धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.हार्बर मार्ग

स्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे

मार्ग : अप आणि डाऊन

वेळ : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०

परिणाम : सीएसएमटी/वडाळा रोड ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान अप-डाऊन आणि सीएसएमटी ते वांद्रे गोरेगावदरम्यान अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहे. पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे

स्थानक : सांताक्रुझ ते गोरेगाव

मार्ग : पाचवी आणि सहावी मार्गिका

वेळ : शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ४.३०परिणाम : शनिवार ते रविवारदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असल्याने पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

0 9 4 7 9 7
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *