भोसा भिवापूर गट ग्रामपंचायत मधील भिवापूर येथे भीषण पाणीटंचाई

Khozmaster
1 Min Read
भोसा भिवापूर गट ग्रामपंचायत  मधील भिवापूर येथे भीषण पाणीटंचाई  असताना  भोसा ग्रामपंचायतचे सरपंच सचिव यांनी  भिवापूर येथील पाणीटंचाई कडे एक वर्षापासून लक्ष न दिल्याने  तसेच जलजीवन मिशनचे एक कोटी 58 लाख रुपयांचे काम मंजूर असताना तेही काम पूर्ण न झाल्याने भिवापूर येथील संतप्त गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून स्वतःची  पैशाची वर्गणी जमा करून पाईपलाईन तयार करून पाणीपुरवठा सुरळीत केला असून प्रत्येकाला नळाद्वारे पाणी जात आहे या पाईपलाईनचे विद्युत पंपासाठी लागणारा विद्युत पुरवठा  सुरू करण्यासाठी दत्ताभाऊ उमाळे यांनी   यांनी महत्त्वाची भूमिका बजावली म्हणूनआज मेहकर चे लोकमत तालुका प्रतिनिधी तथा मेहकर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय दत्ताभाऊ उमाळे   यांच्या हस्ते रीतसर पूजन करून नारळ फोडण्यात आले  व भिवापूर गावातील नळांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला यावेळी भोसा गावचे प्रतिष्ठित नागरिक  नितीन खुरद  धनंजय खंदारकर  भिवापूरचे  श्रीराम दादा फड गजानन मेहत्रे दिनकर मेटांगळे दत्ताभाऊ मेहत्रे  गजानन  मेहेत्रे शिवाजी  मेहेत्रे  लक्ष्मण हजारे बळीराम   मेहेत्रे  दीनानाथ हिवरकर श्रीराम शिंदे गोविंदा डंगरी यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते
0 9 4 7 8 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *