धोत्रा भंनगोजी मन्सूर शहा दै. खोज मास्टर न्यूज.-ग्रामपंचायत च्या दुर्लक्षामुळे धोत्रा.भंनगोजी गावातील सर्व नाल्या गच्च झाल्या असून नालीचे घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. रस्त्यावर डबके साचून त्यामध्ये मच्छर होऊन त्या मच्छरामुळे परिसरातील नागरिकांना गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. वेळोवेळी नागरिकांनी सचिव ,सरपंच , आरोग्य सेवक,तसेच ग्रामपंचायत प्रशासनाच्या निर्देशनात आणून देऊन सुद्धा कोणत्याच प्रकारे नालीसफाई किंवा डबके सफाई झाली नसून. ग्रामपंचायत च्या वतीने उडवा उडी ची उत्तरे नागरिकांना देण्यात येत आहे. सचिव, सरपंचाचे गावाकडे अजिबात लक्ष नसून. ज्या कामात मलाई व कमिशन मिळते असेच काम गावात सुरू असून. नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दिवाळी अगोदर कोणत्याही प्रकारे चे, नाली ,सफाईचे,काम करण्यात नसून. तर दिवाळीनिमित्त , ग्राम पंचायत ने,साफसफाई, दिवे, बदली. कामा,साठी किती खर्च करण्यात आला हे विचारण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.
चिखली तालुक्यातील धोत्रा भंनगोजी गावात घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायत चे दुर्लक्ष! नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
अशाच प्रकारे ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने या घाणीकडे दुर्लक्ष केल्यास, गावात आजाराचे प्रमाण वाढणार आहे. अशाच प्रकारे ग्रामपंचायत चा, भोंगळ कारभार चालत राहिला तर नागरिकांना आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असे नागरिकाकडून बोलल्या जात आहे.
0
9
4
7
8
3
Users Today : 23
Leave a comment