ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांची मुले आदिया आणि कृष्णा १ वर्षांचे झाले असून ईशा आणि वडील मुकेश अंबानी यांनी खास पार्टी आयोजित केली होती. यावेळी अनेक कलाकार मुलांच्या या पार्टीमध्ये सहभागी झाले. फॉरेस्ट थीम असणाऱ्या या पार्टीचे अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत.
मात्र या सगळ्यात ईशाच्या साधेपणा आणि अत्यंत सिंपल लुकने लक्ष वेधून घेतले. आपले वडील मुकेश अंबानी यांचा हात अगदी लहान मुलीप्रमाणे धरत ती मीडियाला सामोरी गेली. त्यावेळी तिच्यावरून नजरा हलल्या नाहीत. फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमध्ये ईशाच एखाद्या लहान मुलीसारखी भासत होती. आपल्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसासाठी कसा होता ईशाचा लुक जाणून घ्या.
ईशाने यावेळी आपले वडील मुकेश अंबानी यासह एंट्री केली. तर गुलाबी रंगाच्या सिंगलेट फ्लोरल प्रिंटेड ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अत्यंत साधा आणि ट्रीपल फ्लेअर असणारा हा ड्रेस खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत असून यामध्ये ईशा स्वतःच एखाद्या लहान मुलीप्रमाणे दिसत होती. दोन मुलांची आई असं कोणीही ईशाचा उल्लेख करणार नाही इतका सुंदर तिचा पेहराव होता.ईशाने या ड्रेससह मधून भांग पाडत केसांचा हाफ बन केला होता आणि अर्धे केस खांद्यावर मोकळे सोडले होते. अत्यंत सामान्य घरातील एखादा वाढदिवस असल्यानंतर जी स्टाईल करण्यात येते तीच स्टाईल ईशाने करत चाहत्यांचे मन जिंकून घेतले. कुठेही दिखावा नाही आणि अत्यंत सुटेबल आणि सुटसुटीत अशी स्टाईल तिने कॅरी केली होती.या ड्रेससह व्हाईट पर्ल अर्थात सफेद मोत्यांचे दागिने ईशाने परिधान केले होते. ड्रेसला परफेक्ट मॅच असेल नाजूक व्हाईट पर्ल दुहेरी नेकलेस आणि लहानशा रिंगमधील मोती असणारे कानातले तिने घालून आपला हा पार्टी लुक पूर्ण केलेला दिसून येत आहे.अत्यंत मिनिमल असे दागिने घालून तिचा हा लुक नक्कीच प्रेरणा घेण्यासारखा आहे.तर आजकाल पार्टीसाठी खूपच डार्क मेकअप करण्यात येतो. मात्र ईशाने यावेळी अत्यंत मिनिमल मेकअप करत नॅचरल ब्युटीला प्राधान्य दिले आहे. फाऊंडेशन, काजळ, लायनर आणि लिपस्टिक, हायलायटर असा साधा आणि सिंपल लुक तिने कॅरी केला आहे. तिच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे तिच्यावरून कोणाचाही नजर हटत नव्हती.
Users Today : 23